भक्तीमा शिस्त
26 भाऊसवन अनी बहिणीसवन, तर मंग काय? तुम्हीन एकत्र जमतस, तवय तुमनामा कोणाजोडे भक्तीगीत, कोणाजोडे शिक्षण, कोणाजोडे देवकडतीन प्रकटीकरण, कोणाजोडे भाषा, कोणाजोडे तिनी व्याख्या अस ऱ्हावाले पाहिजे; हाई सर्वकाही मंडळीना प्रगती करता ऱ्हावाले पाहिजे.