12 आपलाले जगना आत्मा नही, तर देवपाईन जो आत्मा शे, तो मिळना याकरता की, जे देवनी आपलाले कृपातीन देयल शे ते आपण वळखाले पाहिजे.
13 तर आम्हीन मनुष्यना ज्ञानतीन शिकाडेल शब्दसनी नही तर देवना आत्मातीन शिकाडेल शब्दसनी, आत्माना गोष्टी ज्यासले आत्मा शे त्यासले सांगतस. 14 जो माणुस देवना आत्मान्या गोष्टी स्विकारस नही, कारण त्या त्याले मुर्खपणन्या वाटतस; अनी त्यासले त्या वळखता येतस नही कारण त्यासनी पारख आत्माघाई व्हस.