लगीनबद्दल प्रश्न
1 आते त्या गोष्टीसबद्दल ज्या तुम्हीन माले लिखेल शेतस. माणुसनी बाईले हात लावाले नको हाई त्यानाकरता चांगलं शे. 2 व्यभिचार व्हई राहीनात म्हणीन प्रत्येक माणुसले स्वतःनी बायको अनी प्रत्येक बाईले स्वतःना नवरा ऱ्हावाले पाहिजे. 3 नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. 4 बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. 5 एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको.