8 ज्या बिन लगीन व्हयेल शेतस अनं ज्या विधवा शेतस त्यासले मी सांगस, की, तुम्हीन मनामायक राहीनात तर ते तुमनासाठे चांगलं शे; 9 पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
10 ७:१० मत्तय ५:३२; १९:९; मार्क १०:११,१२; लूक १६:१८ लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. 11 सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.