पौल देवना उपकार मानस
3 आपला परमेश्वर अनी प्रभु येशु ख्रिस्तना बाप जो देव, दया करनारा देवबाप अनी सर्वासले सांत्वना देणारा देव, तो धन्यवादित असो.
4 तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे, 5 कारण ख्रिस्तनं दुःख जसं आमनाकरता भरपुर व्हस तसं ख्रिस्तनी मदत बी आमले भरपुर व्हस, 6 आमनावर संकट येस, ते तुमले मदत अनी तुमना उध्दार व्हवाले पाहिजे म्हणीन येस; आमले दिलासा मिळस ती यानाकरता की तुमले मदत मिळाले पाहिजे अनी ज्या दुःख आम्हीन सोसतस ती तुम्हीन धीरतीन सहन करानी. 7 तुमनाबद्दल आमनी आशा भक्कम अशी शे, कारण आमले माहीत शे की जशा तुम्हीन आमना दुःखमा भागीदार शेतस, तसच तुम्हीन मदतना बी भागीदार शेतस.