योसेफ त्याना भाऊसले वळख देस
1 45:1 प्रेषित 7:13 तवय योसेफना आजुबाजूले लोके उभा व्हतात त्यासनासमोर त्याले स्वताले रोकता वना नही; तो मोठा आवाजमा बोलना, की, सर्वा लोकसले बाहेर काढी द्या, मंग योसेफनी आपला भाऊसले वळख दिधी तवय त्यानाजोडे दुसरा कोणी बी नव्हतं. 2 तवय तो इतलं जोरजोरमा रडाले लागना की, ते मिसरी लोकसनी आयकं, अनी फारोना घरनासना बी यानाबद्दल आयकं. 3 तवय योसेफ आपला भाऊसले बोलना, मी योसेफ शे! मना बाप अजून जिवत शे का? त्याना भाऊसना तोंडतीन काही उत्तर निंघना नही, कारण त्यानापुढे सर्वा घाबरी जायेल व्हतात.