ईश्वासी भाऊसनं न्याय कराबद्दल ताकिद
11 भाऊ अनी बहिणीसवन, एकमेकस विरूध्द बोलु नका, जो बंधुसविरूध्द बोलस अनी आपला बंधुले दोष लावस तो नियमनाविरूध्द बोलस अनी नियमले दोष लावस, जर तु नियमले दोष लावस तर तु नियम पाळणारा नही तर न्यायाधीश शे. 12 नियमकर्ता अनी न्यायाधीश असा एकच शे, तो तारण कराले अनी नाश कराले समर्थ शे, आपला शेजारीना न्याय करनारा तु कोण?