Pular para o conteúdo
Publicidade

1 इतिहास 16:34-36

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

34 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.

कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

35 आणि म्हणा, "हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार.

आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव.

आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी

आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे."

36 इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो.

सर्व लोकांनी "आमेन" म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    34 याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;

    त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

    35 यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा;

    परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा,

    जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून,

    तुमच्या स्तवनात गौरव मानावे.

    36 इस्राएलचे परमेश्वर याहवेहची,

    अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो.

    मग सर्व लोकांनी म्हटले "आमेन! याहवेहची स्तुती होवो."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.