Pular para o conteúdo
Publicidade

यशया 1:15-18

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

15 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन;

जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही;

तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत.

16 स्वतःला धुवा, स्वच्छ करा;

तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा;

17 चांगले करण्यास शिका;

न्याय मिळवा, पीडितांची मदत करा,

पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.

18 परमेश्वर म्हणतो, "आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या;

जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील;

जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    15 प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता,

    तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो;

    जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता,

    मी त्या ऐकत नाही.

    तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

    16 "धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा.

    तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा;

    वाईट कृत्ये करणे थांबवा.

    17 योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या.

    पीडितांचे संरक्षण करा.

    पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा;

    विधवांची बाजू मांडा.

    18 "या आता, आपण वाद मिटवू या,"

    असे याहवेह म्हणतात.

    "जरी तुमची पापे लाखेसारखी असली,

    तरी ती बर्फासारखी पांढरी होतील;

    जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली,

    तरी ती लोकरीसारखी होतील.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.