Pular para o conteúdo
Publicidade

यशया 5

द्राक्षमळ्याचा दृष्टांत

1 मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे.

माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे.

2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.

त्याने मळ्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्यामध्ये द्राक्षकुंडहि खणले,

मग त्याने द्राक्षे द्यावी या अपेक्षेत होता पण त्यातून रानद्राक्षे निघाली.

3 म्हणून आता, "यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांनो व यहूदातल्या पुरुषांनो,

माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा.

4 मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी जे केले आहे, त्यापेक्षा मी आणखी करायला पाहीजे असते?

चांगले द्राक्ष यावे म्हणून मी त्याकडे पाहिले असता, त्याने का रानद्राक्षे उत्पन्न केले?

5 आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन.

मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.

6 मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणार नाहीत व कुदळणार नाहीत, पण तण व काटेकुटे फुटतील,

तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन."

7 कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल घराणे होय.

आणि यहूदाचे पुरुष हे त्यातील आनंददायी लागवड होय.

त्याने न्यायाची वाट पाहिली, परंतु त्याऐवजी, तेथे मारणे; न्यायीपणाची वाट पाहिली, परंतू त्याऐवजी, मदतीचा आक्रोश आढळून आला.

दुष्टावर येणाऱ्या आपत्ती

8 जे घराला घर आणि

आपण देशामध्ये रहावे म्हणून जागा न उरेपर्यंत शेताला शेत लावतात, त्यांना हाय हाय!

9 सेनाधीश परमेश्वर माझ्याशी बोलला,

"तेथे खूप घरे रिकामी होतील, मोठी व सुंदर घरे राहणाऱ्यांशिवाय ओसाड पडतील.

10 दहा एकर हे जमीन मोजण्याचे आधुनिक माप नसून एका बैलाच्या जोडीने एका दिवसात नांगरले जाऊ शकते एवढी जमीन आहे.द्राक्षमळा एक बाथसाधारण 22 लिटर रस देईल, आणि एक होमरसाधारण 160 किलोग्राम बी केवळ एक एफा साधारण 16 किलोग्राम उपज देईल.

11 सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय!

जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.

12 मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता

पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत, किंवा त्याच्या हातची कामे ते विचारात घेत नाहीत.

13 यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत,

त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही.

14 यास्तव मृत्यूने आपली भुक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे.

आणि त्यांचे उत्तम लोक, त्यांचा समुदाय, त्यांचे अधिकारी, आणि त्यांच्यातील मौजमजा करणारे आणि आनंदी, हे अधोलोकात जातील."

15 मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे, आणि गर्वीष्ठांचे डोळे खालावले आहेत.

16 सेनाधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचावला जातो, आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायीपणा द्वारे आपणाला पवित्र प्रकट करतो.

17 मग मेंढ्या त्यांच्या कुरणात असल्यासारखे चरतील, आणि श्रीमंतांच्या ओसाड भूमीवर कोकरे चरतील.

18 जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय!

19 जे असे म्हणतात, "देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू,

आणि इस्राएलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येवोत, म्हणजे त्या आम्ही जाणावे. त्यांना हायहाय!"

20 जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात.

ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात,

जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!

21 जे स्वत:च्या नजरेत आपणास शहाणे समजतात आणि आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हायहाय!

22 जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय!

23 जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवितात, आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्यांना हायहाय!

24 यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते,

त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल.

कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.

25 म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे.

डोंगरसुध्दा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत.

हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोकांस शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.

26 तो दूरच्या राष्ट्रांना खूण म्हणून झेंडा उंच करील आणि पृथ्वीवरच्यांसाठी तो शीळ वाजवील,

पाहा ते त्वरेने आणि तातडीने येत आहेत.

27 त्यांच्या मध्ये कोणीच थकलेला व ठेच लागलेला असणार नाही,

त्यांचा कमरबंद कधीच सैल पडणार नाही, आणि त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटणार नाहीत.

28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत आणि त्यांचे धनुष्ये वाकलेली आहेत.

त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे आहेत आणि त्यांच्या रथाचे चाक वादळा प्रमाणे आहेत.

29 त्यांची गर्जना जणूकाय सिंहाच्या गर्जनेसारखी असणार, तरूण सिंहासारखे ते गर्जना करतील.

ते गर्जतील आणि आपल्या भक्ष्याला पकडून खेचत नेतील, वाचवणारा कोणीच नसेल.

30 त्या दिवशी जसा समुद्रगर्जना करतो त्या प्रमाणे ते आपल्या भक्ष्याविरूद्ध गर्जना करतील.

जर कोणी भूमीकडे दृष्टी लावली तर पाहा अंधार व संकट आणि तिच्यावरील अभ्रांनी प्रकाश जाऊन अंधार झालेला आहे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.