Publicidade

Isaías 9

शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द

1 जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल.

मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची,

अप्रतिष्ठा केली,

पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील.

2 जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे;

जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे.

3 तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे,

हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो,

लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत.

4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा,

त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे.

5 कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे

व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील

ती अग्नीला भक्ष होतील.

6 कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे;

आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री,

समर्थ देव, सनातन पिता,

शांतीचा राजा असे म्हणतील.

7 त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही,

दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी

तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील,

सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.

इस्राएलावर परमेश्वराचा कोप

8 प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे.

9 सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,

10 "विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू."

11 म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील;

12 पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील,

कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील. 13 तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.

14 म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.

15 नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.

16 जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात.

17 म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही,

कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते.

या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील.

18 दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते;

वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात.

19 सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत,

आपल्या भावाचीही कोणी मनुष्य गय करीत नाही.

20 ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत.

प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील.

21 मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील.

कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-