Pular para o conteúdo
Publicidade

यशया 14:12-15

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

12 हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस!

ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!

13 जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन,

देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन,

आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन.

14 मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’

15 तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    12 पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा!

    तू स्वर्गातून कसा पडला आहेस,

    तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले,

    तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!

    13 तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला,

    "मी स्वर्गात चढून जाईन;

    मी माझे सिंहासन

    परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन;

    मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन,

    झाफोनच्या14:13 किंवा कनानी लोकांचा पवित्र पर्वत सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन.

    14 मी ढगांच्या शिखरांवर जाईन;

    मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन."

    15 परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात,

    खोल खाईत लोटला गेला आहेस.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.