Pular para o conteúdo
Publicidade

यशया 46:1-4

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

1 बेल बेल, ज्याला मर्दुक म्हणून सुधा ओळखले जाते, तो बाबेलाच्या मुख्य दैवातांपैकी एक होता.खाली वाकला आहे, नबो मर्दुकचा मुलगा झुकला आहे; त्यांच्या मूर्तींचे ओझे जनावरांवर वाहून नेण्यासाठी लादले आहे. या वाहून नेण्याच्या मूर्त्यांचे भारी ओझे थकलेल्या जनावरांवर लादले आहे.

2 ते एकदम लवत आहेत, गुडघे टेकतात; ते प्रतिमा सांभाळू शकत नाहीत,

परंतु ते स्वतःही बंदीवासात जातात.

3 याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही,

ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.

4 तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन.

मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    1 बेल नतमस्तक होतो, नबो46:1 बाबेलच्या दैवतांची नावे वाकून जातो;

    ओझे वाहणारे पशू त्यांच्या मूर्ती वाहून नेतात.

    या प्रतिमांची नेआण तापदायक,

    व थकेलेल्यांना अधिकच ओझे देणारे आहे.

    2 ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात;

    हे ओझे सोडविणे अशक्य झाल्यामुळे,

    ते स्वतःच बंदिवासात जातात.

    3 "याकोबाच्या वंशजांनो,

    इस्राएलच्या सर्व अवशिष्ट लोकांनो, माझे ऐका,

    तुम्ही जन्माला आल्यापासून मीच तुमचे संगोपन केले आहे,

    आणि तुमच्या जन्मापासून मीच तुमची काळजी घेतली आहे.

    4 वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत

    तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल.

    मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन;

    मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.