3 याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही,
ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.
4 तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन.
मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.