देवाच्या सेवकाचे आज्ञापालन
4 थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे.
तो मला सकाळी सकाळी जागे करतो;
तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो.
5 प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे,
आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही.
6 ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली
आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले.
लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही.
7 कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील.
म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही.
8 मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.
9 पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल?
पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील.