परमेश्वराची इस्राएलावरील शाश्वत प्रीती
1 "तू वांझ स्त्री, तू जन्म दिला नाहीस; ज्या तुला प्रसूतिवेदना नाहीत, ती तू आनंदाने आणि मोठ्याने आरोळी मारून जयघोष करून गायन कर.
कारण परमेश्वर म्हणतो, ‘विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा एकाकी असणाऱ्याची मुले अधिक आहेत.’"