14 मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला. 15 तेव्हा यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, "शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?" 16 त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, "माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. 17 जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल. 18 जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
Publicidade