23 मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, "मी तुम्हाला सत्य सांगतो, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे! 24 मी पुन्हा सांगतो की, श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे."
25 येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, "मग कोणाचे तारण होऊ शकेल?"
26 येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, "मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत."