ज्ञानाचा नैतिक लाभ
1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील
आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील,
2 सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील,
तुझे मन समंजसपणाकडे लावशील—
3 मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील,
आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,
4 आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील
आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,
5 तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल
आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.
6 कारण याहवेह सुज्ञान देतात;
त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.