24 ती तागाची वस्त्रे करून विकते
आणि व्यापार्यांना कमरबंद पुरविते.
25 बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत.
भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.
26 तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत.
तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.
27 घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते;
आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.