20 माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे;
माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव.
21 त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस;
त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव;
22 कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत.
आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात.