5 सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर;
माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस.
6 सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल;
तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल.
7 सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव.4:7 किंवा सुज्ञान सर्वश्रेष्ठ आहे; म्हणून ते मिळव
जरी तुझ्याकडे जे आहे4:7 किंवा सुज्ञान जे काही तुला मिळेल ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव.
8 तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल.
ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल;