15 तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी.
तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.
16 तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय,
तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?
17 ते फक्त तुझ्यासाठीच असावेत,
अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.
18 तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो;
आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.
19 प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती—
तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत,
तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.
20 माझ्या मुला, तू दुसर्या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस?
आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?