3 कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते,
आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;
4 परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते,
आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
5 तिचे पाय मृत्यूकडे जातात;
तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.
6 जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही;
तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.
7 मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका;
माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.
8 तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव,
तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,
9 असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्यांना द्यावा
आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,