कालेब हेब्रोन अनं दबीर ताबामा लेस
13 15:13 शास्ते 1:20 यफुन्नेना पोर्या कालेब याले परमेश्वरनी सांगाप्रमाणे यहोशवानी यहुदाना वंशनासंगे वतन दिधा ते म्हणजे किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन शे; हाऊ आर्बा अनाकना बाप. 14 कालेबनी शेशय, अहीमान अनी तलमय या अनाकना तिनी पोर्यासले तठेतीन घालाडी दिद.