परमेश्वर हाच एकमेव मुक्तिदाता
1 तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो,
भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस.
2 जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत.
जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही.
3 कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुझा तारणारा आहे.
मी तुझ्याकरता मिसर खंडणी म्हणून दिला आहे, तुझ्यासाठी मी कूश व सबा यांची अदलाबदल केली आहे.