19 माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
20 मद्यप्यांबरोबर
किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.
21 कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात,
झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.
22 तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक,
तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.