18 तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो,
आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसहतू तरुण असताना केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
19 कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे.
तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत;
तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
20 माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे;
तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?