3 कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो,
आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते,
4 पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे,
आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते.
5 तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात;
तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात.
6 म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही.
तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही.