प्रस्तावना
1 ऊस नावाच्या देशात इय्योब नावाचा एक मनुष्य राहत होता. तो निर्दोष आणि सरळ; परमेश्वराचे भय धरणारा व पापापासून दूर राहणारा असा होता. 2 त्याला सात पुत्र व तीन कन्या होत्या, 3 त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता.