Pular para o conteúdo
Publicidade

इय्योब 1:13-19

13 एके दिवशी इय्योबाचे पुत्र व कन्या आपल्या वडील भावाच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता, 14 एक निरोप्या इय्योबाकडे आला आणि म्हणाला, "बैल नांगरीत होते व गाढवे जवळपास चरत होती, 15 एवढ्यात शबाई लोकांनी आक्रमण करून त्यांना लुटून नेले आणि सर्व चाकरांना तलवारीने वधले. तुम्हाला सांगण्यासाठी मीच एकटा सुटून आलो आहे!"

16 तो बोलतच असताना, दुसरा एक निरोप्या आला व म्हणाला, "परमेश्वराचा अग्नी आकाशातून आला, त्याने मेंढरे आणि चाकरे भस्म केले, तुम्हाला सांगण्यासाठी मीच एकटा सुटून आलो आहे!"

17 तो बोलतच आहे इतक्यात, आणखी एक निरोप्या आला आणि म्हणाला, "खास्द्यांनी तीन टोळ्या केल्या व उंटांवर आक्रमण करून त्यांना घेऊन गेले; त्यांनी चाकरांना तलवारीने वधले, हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!"

18 तो बोलतच असताना, आणखी एक निरोप्या आला व म्हणाला, "तुमचे पुत्र आणि कन्या त्यांच्या वडील भावाच्या घरी मेजवानी करीत आणि द्राक्षारस पीत असता, 19 वाळवंटातून अचानक प्रचंड वारा आला आणि त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्यांच्यावर कोसळले आणि ते मरण पावले; हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!"

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.