Pular para o conteúdo
Publicidade

इय्योब 2

1 पुन्हा एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यास येऊन उभे राहिले; आणि त्यांच्याबरोबर सैतानही स्वतःला सादर करण्यास याहवेहसमोर येऊन उभा राहिला. 2 आणि याहवेहने सैतानाला विचारले, "तू कुठून आलास?"

सैतानाने याहवेहला उत्तर दिले, "मी पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे."

3 तेव्हा याहवेहने त्याला विचारले, "मग माझा सेवक इय्योब याच्याकडे तुझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही; तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा आणि वाईटापासून दूर राहणारा मनुष्य आहे. विनाकारण त्याचा नाश करण्यास जरी तू मला उत्तेजित केलेस, तरी त्याने त्याच्या प्रामाणिकतेला दृढ धरून ठेवले आहे."

4 सैतानाने याहवेहला उत्तर दिले, "त्वचेसाठी त्वचा! मनुष्याचे जे सर्वकाही आहे ते तो आपल्या स्वतःच्या जिवासाठी देईल. 5 परंतु आता, आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसाला लावून तर पाहा, म्हणजे तो खचितच तुमच्या तोंडावर तुम्हाला शाप देईल."

6 त्यावर याहवेहने सैतानाला म्हटले, "ठीक आहे, तो तुझ्या हातात आहे; मात्र तू त्याचा जीव वाचू दे."

7 मग सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि त्याने इय्योबाला तळपायापासून त्याच्या डोक्यापर्यंत वेदनादायक गळवांनी पीडले, 8 तेव्हा इय्योबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी एक फुटलेली खापर घेतली आणि तो राखेमध्ये जाऊन बसला.

9 तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, "तुम्ही अजूनही सत्याला धरून आहात काय? परमेश्वराला शाप द्या आणि मरून जा!"

10 यावर इय्योब म्हणाला, "तू एखाद्या मूर्ख2:10 किंवा अनैतिक स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?"

या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.

11 जेव्हा इय्योबाचे तीन मित्र एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी इय्योबावर आलेल्या संकटांविषयी ऐकले, ते आपआपल्या घरून निघाले; इय्योबाकडे आपण मिळून जावे व त्याला सहानुभूती दाखवून त्याचे सांत्वन करावे असे त्यांनी एकमताने ठरविले. 12 त्यांनी इय्योबाला दुरून पाहिले, तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत; मग ते मोठ्याने रडू लागले, त्यांनी आपले झगे फाडले आणि आपल्या डोक्यावर धूळ घातली. 13 मग ते त्याच्याबरोबर सात दिवस व सात रात्री जमिनीवर बसून राहिले. कोणी एक शब्दही त्याच्याबरोबर बोलले नाही, कारण इय्योबाचे दुःख फार मोठे आहे, हे त्यांना कळले होते.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.