Pular para o conteúdo
Publicidade

इय्योब 38:4,5,8,12,31

OMRCV Marathi Contemporary Version

4 "मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास?

तुला समजत असेल तर सांग.

5 तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार!

तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले?

8 "सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला

तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले,

12 "तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का,

किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे,

31 "कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय?

मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय?

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    4 मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास?

    तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.

    5 जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग?

    मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का?

    8 जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला

    तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला?

    12 तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला

    आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का?

    31 तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का?

    तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.