इय्योब
1 मग इय्योबाने उत्तर दिले,
2 "खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो.
परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल?
3 त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले,
तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही.
4 त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे.
त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?