O poder da oração
A oração é o canal mais poderoso de comunicação com Deus. Através dela, milagres acontecem, montanhas são movidas e o impossível se torna possível.
Pedidos com fé
Jesus ensinou: pedi e recebereis. Tudo o que pedirmos em seu nome, crendo, Ele fará. A fé transforma a oração em poder.
प्रार्थना करण्यास प्रोत्साहन
मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.
जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल."
म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.
पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
Oração e milagres
A oração dos justos tem grande poder. Pedro orou e Dorcas ressuscitou. Jesus disse que certos demônios só se expulsam com jejum e oração.
पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, "तबिथा ऊठ" तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली.
येशू त्यांना म्हणाला, "ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही."
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात,
आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
तो वादळ शांत करतो,
आणि लाटांना स्तब्ध करतो.
समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात,
तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
Orar em todo tempo
A Bíblia nos exorta a orar sem cessar, com ações de graças e súplicas, revestidos da armadura espiritual. A oração traz paz sobrenatural.
कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पाहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.