Pular para o conteúdo
Publicidade

स्तोत्रसंहिता 2

परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य

1 राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत,

आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?

2 पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत,

आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात.

3 चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या.

आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.

4 परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल,

प्रभू त्यांचा उपहास करेल.

5 तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल,

आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील.

6 मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावरहे नाव मारिया डोंगरावरील एका टेकडीला देण्यात आले होते ज्यावर शलमोन राजाने मंदिर बांधले,

माझ्या राजास अभिषेक केला आहे.

7 मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन,

तो मला म्हणाला, "तू माझा पुत्र आहेस."

या दिवशी मी तुझा पिता झालो आहे.

8 मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.

9 लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील,

कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.

10 म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा;

पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.

11 भय धरून परमेश्वराची स्तुती करा

आणि थरथर कापून हर्ष करा.

12 आणि तो तुमच्यावर रागावू नये,

ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही.

कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल.

जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.