विजयासाठी प्रार्थना
1 परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो,
याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.
3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो,
आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो,
आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.