परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे
दाविदाचे स्तोत्र.
1 परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.
मी कोणाचे भय बाळगू?
परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे,
मी कोणाची भीती बाळगू?
5 कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे;
तो मला त्याच्या तंबूत लपवेल,
तो मला खडकावर उंच करील.