मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती
1 हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
2 हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3 हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.