पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती
1 मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन.
माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
2 मी परमेश्वराची स्तुती करणार,
विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
3 तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या.
आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.