आपली भिस्त केवळ देवावर
1 माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे;
त्याच्यापासून माझे तारण येते.
2 तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
5 हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर;
कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
6 तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.