देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती
प्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.
1 मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
2 तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन,
हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.