13 परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो?
"परमेश्वर आपल्या दुष्कृत्यांचा झाडा कधीच घेणार नाही,"
असे तो आपल्या स्वतःशी का म्हणतो?
14 परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता;
तुम्ही त्यांची संकटे लक्षात घेऊन आपल्या नियंत्रणात घ्या.
ते पीडित स्वतःला तुमच्या स्वाधीन करीत आहेत;
कारण तुम्ही पितृहीनांचे साहाय्यकर्ता आहात.