दावीदाची रचना
1 माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.
2 हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको.
3 जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात,
जे तुझे सर्व रोग बरे करतात.
4 जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात;
आपल्या प्रीतीचा आणि दयेचा तुला मुकुट घालतात.