39 याहवेहनी इस्राएलावर मेघाचे छत्र पसरले,
आणि रात्री प्रकाशासाठी अग्निस्तंभ दिला.
40 त्यांनी याचना केली, तेव्हा परमेश्वराने लावे पक्षी पाठविले;
त्यांना स्वर्गातील भाकर देऊन तृप्त केले.
41 त्यांनी खडक फोडला आणि पाणी उफाळून बाहेर आले;
त्याची नदी होऊन ती वैराण प्रदेशातून वाहू लागली.