9 तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील?
ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.
10 तुम्हाला शोधण्याचा मी पूर्ण हृदयाने प्रयत्न केला आहे;
त्या आज्ञेपासून मला बहकून जाऊ देऊ नका.
11 मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत,
जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.