3 मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
4 तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
5 ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.