संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र.
1 याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि
मला ओळखले आहे.
2 माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता;
दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.
3 माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात;
माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.
4 हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच,
ते सर्व तुम्हाला माहीत असतात.