दावीदाचे स्तोत्र.
1 याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो,
ते माझ्या बाहूंना युद्धाचे
व माझ्या बोटांना लढाईचे प्रशिक्षण देतात.
2 तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग,
सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत;
तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत,
ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात.