3 तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत;
तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.
4 कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते;
त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात.
5 तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे,
आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,